नुकतेच आंतरजालावर फेरफटका मारताना हे उबंटू मार्गदर्शक पुस्तक हाती लागले। लेखकाने उबंटू ची कथा आणि ही प्रणाली संगणकावर कशी स्थापित करावी याबद्दल सुंदर मार्गदर्शन केले आहे । ही पुस्तिका पीडीऍफ़ प्रकारात असून मोफत उतरवून घेता येते।

याचा दुवा : http://ubuntupocketguide.com/

आपला एक लिनक्स प्रेमी

धर्मराज



नमस्कार मंडळी,
कालचा साजरा झालेला व्ह्याँलेंटाइन दिवस मनात अनेक प्रश्न उभे करून गेला।
एका उपहार गृहात कोवळया वयाची जोड़ी बसली होती। बहुतेक शाळेत जाणारी असावी। मुलाने त्याच्या मैत्रिणीला घास भरविने चालले होते आणि ती मुलगी आणि तिची मैत्रिण हसत खिदळत त्याचा आस्वाद घेत होती।
ते दृश्य पाहून मनाला फार वेदना झाल्या। या वयात शिकायचे सोडून काय काय करतात मुले ?
त्यांच्या समोरच्या टेबलावर एक मध्यमवयीन आपल्या तरुण मुलीबरोबर होते आईच्या चेहर्य़ावरील भाव मनाला वेदना देणारे होते। एकाच वेळी त्यामधून त्या मुला मुलिबद्दलची चीड,संताप, आपल्या मुलिबद्दलची वाटणारी काळजी, आणि अगतिकता व्यक्त होत होती।

क्षणभर वाटले की हे सर्व थांबले पाहिजे ! पण हे थांबणार कसे ?

आज तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिनिबरोबर फिरत असाल तर तुम्हाला काही वावगे वाटणार नाही। पण तुम्ही जेव्हा आई बाप बनाल तेव्हा तुम्हाला काय वाटेल ?

आहे काही उत्तर तुमच्याकडे ?

कधी कधी वाटते की शिवसेना / श्रीरामसेना करते ते योग्य आहे। पण नाही, ही तर हिंसक कृति आहे आणि पालक तरी आपल्या पाल्याबाबत अशी भूमिका घेऊ शकत नाही।

या जखमेवर खराखुरा उपाय शोधण्याची गरज आहे।







नमस्कार,
फुकट चा माल चांगला आसतो काय ? या वाक्यावर तुमचे काय मत आहे ? सर्वच फुकट चा माल काही ख़राब नसतो बर का !
आता हेच पाहा ना ! संगणक विषाणु (व्हायरस) ने तुमचा जीव भंडावून सोडला असेल। त्याच्या जोडीला स्पायवेअर आहेच। तुम्ही पैसे देवून, चोरून मारून (क्रैक) वापरून सिम्यांतेक, मक्फी इ वापरता पण उपयोग शुन्य।

तर मग हे वापरून बघा। याचा दुवा (लिंक) आहे
www.clamwin.com
हे एक सुंदर आणि फुकट सोफ्टवेअर आहे।
आपल्या प्रतिक्रिया मला जरुर सांगा।
आपलाच ,
धर्मराज (संगणक विषाणु नाशक)











नमस्कार मंडळी,


सोमवार आला की मला माझे लहनपनाचे दिवस आठवतात शाळेत जायचा वैताग आला की मला चक्कर यायची, पोट दुखायचे, आणि बरेच काय काय होत असे।


आजदेखिल सोमवारचा दिवस उजाडला की मला लहान मुलासारखे काहीतरी कारण सांगुन घरी बसवेसे वाटते


आपल्यातील लहान मूल कधीच मरत नाही हेच खरे


आज प्रत्येकजन शिक्षणाचे महत्त्व सांगू लागला आहे मराठी माध्यमातून शिकणे म्हणजे मागासलेपनाचे लक्षण वाटू लागले आहे इंग्लिश मीडियम देखिल कमी म्हनू की काय आता इंटरनेशनल अभ्यासक्रम शिकणे कसे आवश्यक आहे ह्यावर चर्चा झडत आहेत


पण खरे सांगू दोस्तानो ! ह्या स्पर्धेत मुलांचे बालपण हरवले आहे चकाचक फैशन च्या दुनियेत मनाचा निरागासपना हरवत चालला आहे


भविष्याची तरतूद करताना मुलांचा वर्त्तमान काळ नाहीसा होत आहे आणि भूतकाळ तर त्यांना नासवाच असे वाटत आहे


तुम्ही कधी मुनिसिपल शालेत शिकणारी मुले बघितली आहेत काय ? एक बाजुला शिक्षक शिकवत आहेत आणि दुसर्या बाजुला मुलांच्या बालसुलभ खोड्या चालु आहेत !


खरे सांगू मित्रानो ! मला आता ह्या क्षणी मुनिसिपल शालेताले मूल व्हावेसे वाटत आहे माझ्या लहानपणी मूल कमीतकमी वर्षांचे होत नाही तोपर्यंत शालेत जात नसे आता तर मूल एक वर्षाचे झाले रे झाले की त्याच्यामागे प्लेग्रुप, नर्सरी मोंटेसर इत्यादि इत्यादि झंझट चालु होते  मी खरोखरच खुप नशीबवान आहे आमची पीढी खुपच नशीबवान आहे की ज्याना आपले बालपण व्यवस्थित उपभोगता आले










नमस्कार मंडळी !
मुंबई वरील अतिरेकी हल्ल्याचे सावट आता दूर झाले आहे। मुम्बैकर आपल्या दैनंदिन जीवनात पुन्हा एकदा मग्न झाला आहे।
ह्याचे कौतुक करायचे की हा एक दोष समजायचा ?
आम्हाला कोणतीही बातमी फक्त दोन दिवस पुरते मग आम्ही ती विसरून जातो।

आता वेळ आहे जागृत होण्याची । नविन धडा शिकण्याची ।
जर पुन्हा अशा घटना घडू नयेत असे वाटत असेल तर जागरुक रहाण्याची गरज आहे
पोलीस किंवा आर्मी रोज आपल्या मदतीला येवू शकणार नाहित। आता आपले रक्षण आपणच करण्याची आवश्यकता आहे।
मात्र याचा अर्थ असा नव्हे की आपण बंदुका हाती घेतल्या पाहिजेत । डोळे उघडे ठेवा, कान उघडे ठेवा आणि द्वेषजनक वक्तव्ये करण्याचे टाला।
जय हिंद !! जय महाराष्ट्र !!


मुंबई वरील अतिरेकी हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे मात्र खेदाने असे म्हणावे लागते की मीडिया देखिल अतिरेकी गटात मोडतोय ! हे मुर्ख लोक आपल्या चैनल चा टी आर पि साठी सगळी माहिती अतिरेक्याना बसल्या बसल्या देत आहेत। सरकारने लाइव रिपोर्टिंग ला बंदी घातले हे चांगलेच जाले पण त्याला फारच उशीर जाला आहे।
भविष्यात अशा गोष्टी करीता कड़क कायदा करण्यात यावा