नमस्कार मंडळी,


सोमवार आला की मला माझे लहनपनाचे दिवस आठवतात शाळेत जायचा वैताग आला की मला चक्कर यायची, पोट दुखायचे, आणि बरेच काय काय होत असे।


आजदेखिल सोमवारचा दिवस उजाडला की मला लहान मुलासारखे काहीतरी कारण सांगुन घरी बसवेसे वाटते


आपल्यातील लहान मूल कधीच मरत नाही हेच खरे


आज प्रत्येकजन शिक्षणाचे महत्त्व सांगू लागला आहे मराठी माध्यमातून शिकणे म्हणजे मागासलेपनाचे लक्षण वाटू लागले आहे इंग्लिश मीडियम देखिल कमी म्हनू की काय आता इंटरनेशनल अभ्यासक्रम शिकणे कसे आवश्यक आहे ह्यावर चर्चा झडत आहेत


पण खरे सांगू दोस्तानो ! ह्या स्पर्धेत मुलांचे बालपण हरवले आहे चकाचक फैशन च्या दुनियेत मनाचा निरागासपना हरवत चालला आहे


भविष्याची तरतूद करताना मुलांचा वर्त्तमान काळ नाहीसा होत आहे आणि भूतकाळ तर त्यांना नासवाच असे वाटत आहे


तुम्ही कधी मुनिसिपल शालेत शिकणारी मुले बघितली आहेत काय ? एक बाजुला शिक्षक शिकवत आहेत आणि दुसर्या बाजुला मुलांच्या बालसुलभ खोड्या चालु आहेत !


खरे सांगू मित्रानो ! मला आता ह्या क्षणी मुनिसिपल शालेताले मूल व्हावेसे वाटत आहे माझ्या लहानपणी मूल कमीतकमी वर्षांचे होत नाही तोपर्यंत शालेत जात नसे आता तर मूल एक वर्षाचे झाले रे झाले की त्याच्यामागे प्लेग्रुप, नर्सरी मोंटेसर इत्यादि इत्यादि झंझट चालु होते  मी खरोखरच खुप नशीबवान आहे आमची पीढी खुपच नशीबवान आहे की ज्याना आपले बालपण व्यवस्थित उपभोगता आले










This entry was posted on 12:41 AM and is filed under . You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.

2 comments:

    Minanath Dhaske said...

    Ajunahi tasech watate....
    fakt shalechi jaga office ne ghetali aahee....

    nice one .. keep posting

  1. ... on December 9, 2008 at 7:11 PM  
  2. Unknown said...

    Agdai Barobar .. saglyach kamavar janarya mandalina hech watat aasanar

  3. ... on December 1, 2011 at 2:24 AM