नमस्कार मंडळी, कस काय मजेत ना ?


कसली मज़ा राव ? पेपर वाचता ना रोज ? आर्थिक मंदी ने जग अगदी मेटाकुटिस आले आहे


शेयर मार्केट गडगडलाकंपन्या स्टाफ ला कमी करत आहेत आणि तुम्ही विचरता की मजेत ना ? काय राव मस्करी करता काय गरीबाची (पुर्वश्रमिचा श्रीमंत असलेल्याची) ?





अहो पण मी म्हणतो मंदी ची ही संधि आलीच आहे तर तिचा करून घ्या ना ! काय काय करू शकतो आपण ?


----------------------------------------------------------------------------------------------


मंदी चालू आहे आणि तुम्ही घरी बसला आहात तर हे करा


१) रोज सकाळी उठून मंदिरात जा आणि दूसरी नोकरी मिळावी म्हणुन देवाला प्रार्थना करा (कामावर जायचे
नाही तर लवकर न उठता दुपारी उठून जा )



२) आजुबाजुच्या पेपर स्टाल वर जावून सर्व मराठी पेपर वाचून काढा (कामावर असताना तुम्हाला मराठी पेपर
दिसत नसेलच अथवा मराठी वाचायची लाज वाटत असेल )



३) माझ्या सारखे मराठी ब्लॉग लिहत बसा


४) मराठी ब्लोग्स वाचत बसा (http://marathiblogs.net/)
















This entry was posted on 10:16 PM and is filed under . You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.

0 comments: